लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या त्रयीतर्फे महाराष्ट्रात मानाचा ठसा

पालघर: तरुणाई फाउंडेशन कुटसा द्वारा आयोजित अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनात पालघर जिल्ह्यातील लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे तसेच साप्ताहिक नवाहाल चे संपादक आणि लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे पालघर जिल्हा अध्यक्ष व कोकण प्रभारी जे पी करोतीया, व संघर्ष जनतेसाठी चे संपादक व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा सचिव संतोष घरत,सामाजिक कार्यकर्ते आणि साप्ताहिक दिव्यांग शक्ती पालघर जिल्हा प्रतिनिधी तसेच लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख देवेंद्र मेश्राम यांना राज्यस्तरीय पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.या मध्ये जे पी करोतीया यांना राज्यस्तरीय आदर्श गुणिजनरत्न जीवनगौरव पुरस्कार 2025,संतोष घरत यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार 2025, देवेंद्र मेश्राम यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समजरत्न पुरस्कार 2025 ने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.त्या कार्यक्रमाला अकोला व मुंबई येथून अनेक लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे पदाधिकारी उपस्थित होते.

लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ मुंबई कोकण विभागाचा 8 वा मासिक विचार मंथन व मार्गदर्शन मेळावा…
शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी विदर्भ मंदिर, कबुतरखान्याजवळ , दादर मुंबई येथे संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष जे पी करोतीया संपादक नवाहाल,कोकण प्रभारी तथा जिल्हा अध्यक्ष लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर,विशेष प्रमुख अतिथी गजानन भाऊ नागे सरचिटणीस बेस्ट कामगार संघटना तथा राज्य उपाध्यक्ष भाजप कामगार आघाडी मुंबई, संजय एम देशमुख ज्येष्ठ पत्रकार तथा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ अकोला व राष्ट्रीय पदाधिकारी ईलना नवी दिल्ली, पुष्पराज गावंडे राष्ट्रीय मार्गदर्शक पदाधिकारी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ अकोला तथा माजी सदस्य महा. राज्य साहित्य व सस्कृति मंडळ, रफिक मुलानी मंत्रालयीन समन्वयक तथा महाराष्ट्र संघटन व संपर्क प्रमुख लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ मुंबई.तसेच सूत्र संचलन विनोद चाळके प्रभारी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ मुंबई यांनी केले. सुषमा ठाकूर महिला पत्रकार आघाडी प्रमुख तथा संघटक संपर्क प्रमुख उपस्थित होते.संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख साहेबांनी आपल्या प्रस्तावित भाषणात सांगितले की संस्था द्वारा साडे चार वर्षात केलेल्या उल्लेखनीय आढावा आपल्या भाषणात सांगितले.कार्यक्रम प्रमुख अतिथी गजानन नागे यांनी राष्ट्र संत गाडगे महाराज आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ चालतो.असे त्यांनी स्पष्ट केले.आणि जे महासंघ चे कार्य सुरू आहे त्याची त्यांनी प्रशंसा केली.त्यांनी केंद्र शासनाने मागणी केली आहे की राष्ट्र संत गाडगे महाराज यांना भारत रत्न मिळावा अशी मागणी केली आहे.या मागणी साठी आम्हाला लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ ने आम्हाला सहकार्य करावे असे गजानन नागे यांनी आपल्या भाषणात सांगितले.यात नंतर संस्थापक अध्यक्ष संजय एम देशमुख यांनी गजानन नागे यांना सांगितले की आमचा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करणार असे सांगत कार्यक्रमाचे अध्यक्ष जे पी करोतीया यांनी सर्वांचे आभार मानले.आणि कार्यक्रम समापन ची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top